वेगळा विदर्भ नाही, जैतापूर प्रकल्प होणारच : अमित शाह

शिवसेनाच विरोध असला तरी जैतापूर प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच अशी माहिती भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गोव्यात दिलीय. 

Updated: May 29, 2015, 12:29 PM IST
वेगळा विदर्भ नाही, जैतापूर प्रकल्प होणारच : अमित शाह title=

पणजी : शिवसेनाच विरोध असला तरी जैतापूर प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच अशी माहिती भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गोव्यात दिलीय. 

त्यांनी वेगळ्या विदर्भाला मात्र विरोध केलाय आणि आम्ही वेगळ्या विदर्भाचं आश्वासन कधीच दिलं नाही याचा पुनरुउच्चार केलाय. दुसरीकडे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनीही जैतापूर होणारच, अशी भूमिका मांडलीय.

राज्यात सुरुवातीला शिवसेना सत्तेत सहभागी नव्हती. मात्र नंतर त्यांच्यात परिवर्तन झालं आणि ते सत्तेत सहभागी झाले तसेच परिवर्तन जैतापूरच्या अणुप्रकल्पाबाबत त्यांच्यात होईल, असं गोयल म्हणालेत.

मात्र या प्रकल्पाला विरोध होता आणि कायम राहिल यावर शिवसेना तडजोड करणार नाही, असा इशारा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.