नवी दिल्ली: दिल्लीत पुन्हा ‘निर्भया’ सारख्या बलात्कार कांडानं हादरलीय. नराधामांनी घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केलाय. बलात्कारानंतर त्यांनी त्या मुलीच्या शरीरासोबत खेळ केलाय. पश्चिम दिल्लीतील मुंडका भागात हा प्रकार घडलाय.
मुंडका परिसरात राहणाऱ्या आसामच्या ३० वर्षीय महिलेवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या चौघांनी गँगरेप केला. पोलिसांनी शनिवारी या चारही आरोपींना अटक केलीय.
महिला आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर इथं एकटी राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार चार शेजारी काही दिवसांपासून तिला त्रास देत होते. पोलिसांनी सांगितलं, ८ नोव्हेंबरला हे चौघं तिच्या घरात शिरले, तिला मारलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घरातील आवाज ऐकून कोणीतरी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून आरोपींना अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.