बराच काळ सेक्सला सहमती न देणे घटस्फोटाचा आधार – सुप्रीम कोर्ट

 बराच काळ जीवनसाथीला शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती नाही देणे, ही मानसिक क्रुरता आहे आणि हे घटस्फोटासाठी आधार होऊ शकतो, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे.

Updated: Sep 24, 2014, 06:13 PM IST
बराच काळ सेक्सला सहमती न देणे घटस्फोटाचा आधार – सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली :  बराच काळ जीवनसाथीला शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती नाही देणे, ही मानसिक क्रुरता आहे आणि हे घटस्फोटासाठी आधार होऊ शकतो, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे.

न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्यायच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याबाबत निर्णय देताना सांगितले की, जीवनसाथीला योग्य कारणाशिवाय बराच काळ सेक्सला नकार देणे ही मानसिक क्रुरता आहे. कोर्टाने या व्यवस्थेसोबत मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाला योग्य ठरवले. याद्वारे एका व्यक्तीला या आधारे घटस्फोटाला मान्यता दिली.

हायकोर्टात या व्यक्तीने आरोप लावला होता की, त्याची पत्नी सेक्स संबंध ठेवण्यास नकार देते आणि इतर प्रकारे त्याच्याशी क्रुरतापूर्ण व्यवहार करते.

मूल नको आहे म्हणून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या पत्नीच्या जबाबाला सुप्रीम कोर्टाने अमान्य केले. कोर्टाने लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या पतीला आदेश दिल की त्याने आपल्या पत्नीला एक रकमी ४० लाख रुपये निर्वाह खर्च द्यायला हवा.

कोर्टाने सांगितले की, पती-पत्नी दोघेही शिक्षित आहे आणि त्यांनी गर्भनिरोधक उपाय केले पाहिजे, त्यामुळे गर्भधारणेपासून ते वाचू शकतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.