नवी दिल्ली : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रेल्वेनेही हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समतोल राखण्याची सुरूवात म्हणून एक इको फ्रेंडली रेल्वेही चालवली जात आहे.
ही ट्रेन डिझेल इलेक्ट्रीक मल्टीपल यूनिट आहे आणि ही ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच कारखान्यात बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही गाडी सीएनजीने चालणार आहे. ही भारताची पहिली ट्रेन आहे, जी सीएनजी म्हणजेच कंप्रेस्ड नॅचरल गॅसने चालू शकते.
सीएनजीचा वापर करण्याचा सर्वात मोछा फायदा म्हणजे, यात प्रदुषण होत नाही आणि विषारी गॅसेस वातावरणात मिसळले जात नाहीत. सीएनजी कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणही कमी करतं.
या ट्रेनला सीएनजीने चालवण्याचं तंत्रज्ञान रेल्वेची सहयोगी टेक्नॉलॉजी संस्था इंडियन रेल्वे ऑर्गनायझेशन फॉर आल्टरनेटीव्ह फ्यूल्सने तयार केली आहे. सीएनजीच्या आणखी आठ ट्रेन तयार करण्याचं काम पूर्ण होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.