नवी दिल्ली: पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार देशभरातील पोस्ट ऑफिसच्या काही निवडक शाखांमध्ये एटीएम कार्डची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार आता या शाखा आपल्या ग्राहकांना एटीएम कार्ड देऊ शकतील. पैसे काढण्यासाठी त्यांना पोस्ट ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही. शिवाय पोस्ट ऑफिस बँकांसारखंच आपल्या ग्राहकांच्या खात्याचं स्टेटमेंट सुद्धा देईल.
मंगळवारी सरकारनं एक अधिसूचना जारी करून पोस्ट ऑफिस कायदा १९८१मध्ये बदल केलाय. आता पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देतील. आता शाखांमध्ये जिथं इलेक्ट्रॉनिक बँकिंग आहे आणि जिथं कोअर बँकिंगचं सॉफ्टवेअर आहे तिथं आता एटीएम कार्डही दिलं जाईल.
ग्राहकांना आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. ते ऑनलाइनच आपले पैसे ट्रान्सफर करू शकतील. एखाद्या बँकेसारखं पोस्ट ऑफिस काम करेल.
संपूर्ण देशात अडीच लाखहूनही अधिक पोस्ट ऑफिस आहेत. त्यातील ९० टक्के पोस्ट ऑफिस गावांमध्ये आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.