नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आता सोशल नेटवर्कींग साईट ट्विटरवर आले आहेत आणि त्यांच्या अकाऊन्टवर फक्त राष्ट्रपती भवनाच्या ताज्या बातम्या लोकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
ट्विटरवर @राष्ट्रपति भवन यावर संदेश आलाय की, राष्ट्रपती भवन आता ट्विटरवर. कृपया नियमित माहितीसाठी फॉलो करा.
Rashtrapati Bhavan is now on Twitter. Please follow us for regular updates.— President of India (@RashtrapatiBhvn) July 1, 2014
काल दुपारपासून अकाऊन्टवर फॉलोअर्सचा प्रभाव पडला आहे. आतापर्यंत 9 हजार फॉलोअरर्सनी राष्ट्रपती भवनाला फॉलो केलंय.
जुलै 2006ला ट्विटरची सुरुवात झाली होती त्यानंतर देशाच्या राष्ट्रपतीचं हे पहिलं अकाऊन्ट आहे. ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी सतत संपर्कात राहणं हे राष्ट्रपती भवनाचा प्रयत्न असणार आहे.
या आधीही फेसबुकवर राष्ट्रपती भवनातील नेहमीच्या घडामोडींची माहिती उपलब्ध करुन देणारे प्रणब मुखर्जी पहिले राष्ट्रपती आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.