आता स्पाइसजेटनं करा 499 रुपयांत विमान प्रवास

देशातील दुसरी मोठी विमान कंपनी असलेल्या स्पाइसजेटनं स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना आजपासून सुरू केलीय. ‘अर्ली बर्ड’ अयं या योजनेचं नाव आहे. यात घरगुती शहरांमध्ये अवध्या 499 रुपयांत विमान प्रवासाचं तिकीट असेल. 

PTI | Updated: Sep 1, 2014, 06:05 PM IST
आता स्पाइसजेटनं करा 499 रुपयांत विमान प्रवास   title=

मुंबई : देशातील दुसरी मोठी विमान कंपनी असलेल्या स्पाइसजेटनं स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना आजपासून सुरू केलीय. ‘अर्ली बर्ड’ अयं या योजनेचं नाव आहे. यात घरगुती शहरांमध्ये अवध्या 499 रुपयांत विमान प्रवासाचं तिकीट असेल. 

कंपनीच्यावतीनं सांगण्यात आलंय की, ही विशेष योजना केवळ तीन दिवसांसाठी आहे. आजपासून बुकिंग सुरू झालीय. या योजनेअंतर्गत पुढील वर्षी 16 जानेवारी ते 24 ऑक्टोबर दरम्यान, प्रवास करता येणार आहे. 

या तिकीटमध्ये एकीकडलं भाडं 499 रुपये (यांत इंधन शुल्क जोडलेलं आहे. पण वैधानिक कर आणि शुल्क नाही) आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, या तिकीटच्या विक्रीपूर्वी प्रवास आणि सुट्ट्यांची योजना आखून कमी भाड्यामध्ये तुम्ही प्रवास करू शकता. ही योजना फक्त घरगुती विमान मार्गांवर आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.