इस्लामाबादेत पी-टीव्ही कार्यालयात आंदोलनकर्ते घुसले

सरकार विरोधात प्रदर्शन करणारे आंदोलक आता पाकिस्तानचं सरकारी चॅनेल, पी टीव्ही कार्यालयात घुसले आहेत. आंदोलकांनी पी-टीव्हीचं प्रसारण बंद केलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. 

Updated: Sep 1, 2014, 01:35 PM IST
इस्लामाबादेत पी-टीव्ही कार्यालयात आंदोलनकर्ते घुसले title=

इस्लामाबाद : सरकार विरोधात प्रदर्शन करणारे आंदोलक आता पाकिस्तानचं सरकारी चॅनेल, पी टीव्ही कार्यालयात घुसले आहेत. आंदोलकांनी पी-टीव्हीचं प्रसारण बंद केलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. 

'पी-टीव्ही'च्या कार्यालयात आंदोलकांनी धुडगूस घातला आहे. कार्यालयाचं गेट तोडून आंदोलक आता शिरले आहेत. आर्मीने आंदोलकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या आधी आंदोलकांची ही गर्दी सचिवालयातही घुसली होती, यासाठी सचिवालय आणि संसदेबाहेर आर्मीचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

सोमवारी सकाळी सुरक्षा कर्मचारी कमी असल्याचं पाहून, आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान निवासाकडे कूच केली होती. रविवारी झालेल्या झडपेत तीन जण ठार झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.