पठाणकोट हल्ला; फितुर इंजीनिअरला अटक

पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी लष्कराच्याच एका इंजीनिअरला फितुरी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. या लष्करच्या अभियांत्रिक विभागात काम करणारा हा अभियंता पठाणकोट वायुसेना तळावरच काम करत होता. 

Updated: Jan 8, 2016, 10:34 PM IST
पठाणकोट हल्ला; फितुर इंजीनिअरला अटक title=

पठाणकोट : पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी लष्कराच्याच एका इंजीनिअरला फितुरी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. या लष्करच्या अभियांत्रिक विभागात काम करणारा हा अभियंता पठाणकोट वायुसेना तळावरच काम करत होता. 

दहशतवाद्यांनी अकरा फुटी भिंत ओलांडून वायूसेनेच्या तळावर प्रवेश केला, त्यावेळी फ्लड लाईस्ट बंद होते. त्यामुळे दहशतवाद्यांचा मार्ग सोपा झाल्याचा संशय आहे. याचप्रकरणी भारतानं पाकिस्तानकडे ४ दहशतवाद्यांची नावं सोपवली आहेत. त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी पाकिस्तानकडे करण्यात आलीय.

शिवाय येत्या १५ तारखेला होणाऱ्या दोन्ही देशातल्या परराष्ट्र सचिवस्तरावरील चर्चा होण्याआधी पाकिस्तानं या दहशतवद्यांवर ठोस कारवाई करावी अशी भारताचा सल्ला आहे. 

जोपर्यंत ही कारवाई होत नाही, तोवर चर्चा स्थगित राहील असंही भारताच्या वतीनं पाकिस्तानला कळवण्यात आलंय, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्येही सूत्र फिरली आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल यासंदर्भात त्यांच्या मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांची चर्चा झाली. 

शिवाय दहशतवादी संघटनावर कठोर कारवाईचं आश्वासन शरीफ यांनी याआधीच पंतप्रधान मोदींना दिलं आहे. आता भारताला या कठोर कारवाईची प्रतिक्षा असल्याचं भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव अनिल स्वरूप यांनी स्पष्ट केलंय.