अयोध्येत राम मंदिर झाले तर सोन्याचा मुकूट करेल - मुस्लिम नेता

अयोध्येत भगवान रामाचे एक भव्य मंदिर व्हायला हवे असे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते बुक्कल नबाव वाटत आहे

Updated: Jan 8, 2016, 06:04 PM IST
अयोध्येत राम मंदिर झाले तर सोन्याचा मुकूट करेल - मुस्लिम नेता  title=

लखनऊ :  अयोध्येत भगवान रामाचे एक भव्य मंदिर व्हायला हवे असे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते बुक्कल नबाव वाटत आहे. ते म्हणाले, मी एक मुस्लिम आहेत आणि भगवान रामाचा खूप सन्मान करतो. मला वाटते की अयोध्येत रामाचं एक भव्य मंदिर व्हायला हवे. 

त्यांनी न्यूज संस्था एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, मी वाटते की अयोध्ये राम मंदिर व्हायला हवे. त्याचे निर्माण कार्य सुरू होईल तेव्हा मी १० लाख रूपयांचे दान देणार आहे. त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर रामासाठी सोन्याचा मुकूट बनविणार आहे. 

बुक्कल नबाव हे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते शिया मुसलमान आहे. या पूर्वी काही समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी राम मंदिरासंदर्भात वक्तव्य केले होते त्यानंतर त्यांना आपली पदे सोडावी लागली होती. 

काही दिवसांपूर्वी भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते की या वर्षाच्या अखेरीस राम मंदिर पूर्ण होईल. स्वामी म्हटले की ९ जानेवारीला होणाऱ्या पत्रकार परिषदेत याचा अॅक्शन प्लान जाहीर होईल. 

मंदिर जोर जबरदस्तीने नाही तर कोर्टाच्या आदेशानुसार होईल असे स्वामी यांनी सांगितले आहे.