केवळ एक टक्का लोक भरतात टॅक्स

देशातील एकुण लोकसंख्येपैकी केवळ एक टक्काच लोक कर भरत असल्याचं समोर आलंय. 

Updated: May 2, 2016, 11:02 AM IST
केवळ एक टक्का लोक भरतात टॅक्स title=

नवी दिल्ली : देशातील एकुण लोकसंख्येपैकी केवळ एक टक्काच लोक कर भरत असल्याचं समोर आलंय. 

सरकारने २०१२-१३ या वर्षात कर भरण्या-यांची संख्या १.२५ कोटी असल्याचं सांगितलंय. त्यावेळेस देशाची लोकसंख्या १२३ कोटी होती. या लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास एक टक्काच लोक कर भरत असल्याचं चित्र समोर आलंय.

आकडेवारीनुसार, एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ८९ टक्के लोकांनी दीड लाखाहून कमी कर भरलाय. ही सरासरी २१ हजार कोटी इतकी आहे. सरकारच्या तिजोरीत एकूण २३ हजार कोटी रुपये जमा झाले. एकूण मिळून पाच हजार ४३० लोकांनी एक कोटीहून अधिक कर भरलाय.