पाहा, वाळूत साकारलेलं चिमुकल्या आयलानचं हृदयद्रावक चित्र!

तुर्कीमध्ये जलसमाधी मिळालेल्या चिमुरड्या अयलानला भारतानंही श्रद्धांजली वाहिली आहे. 

Updated: Sep 5, 2015, 03:47 PM IST
पाहा, वाळूत साकारलेलं चिमुकल्या आयलानचं हृदयद्रावक चित्र! title=

ओडिशा : तुर्कीमध्ये जलसमाधी मिळालेल्या चिमुरड्या अयलानला भारतानंही श्रद्धांजली वाहिली आहे. 

ओरिसामध्ये सुदर्शन पटनायक यांनी वाळूमध्ये अयलान याचं शिल्प साकारुन त्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर तीन वर्षांचा मुलगा अयलान याचा बुडून मृत्यू झाला होता. या निरागस चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यूनं अख्खं जग हळहळलं. अलायनचा मृत्यू ही शरणार्थींची होत असलेल्या ससेहोलपटीचं जळजळीत उदाहरण आहे. 

अधिक वाचा - वेदनादायक चित्र : सीरियन मुलाचे वडील म्हणाले, "माझ्या हातातून आयलानचा हात सुटला"

घडलेली घटना सांगताना 'नौका बुडत होती. ही बाब मी माझ्या पत्नीला सांगितली. मी पत्नीचा हात पकडला होता. मात्र, माझ्या हातातून मुलाचा हात सुटला आणि तो पडला. त्यावेळी अंधार होता. त्यावेळी काळोखात ओरडण्याचा, आक्रोशाचा आवाज येत होता. त्याने छोट्या नौकेला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोराचा वारा असल्याने त्याचा]प्रयत्न असफल झाला' असं म्हणत आयलानचे वडीलांनी टाहो फोडला.

अधिक वाचा -  चिमुरड्याचा निष्प्राण देह पाहून अंगावर काटा उभा राहिल

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.