बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुलायमसिंगांना पटविण्यासाठी लालूंची धावपळ

महाआघाडीतून मुलायम सिंग यादव बाहेर पडल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांची धावाधाव सुरू झालीय. 

PTI | Updated: Sep 4, 2015, 05:41 PM IST
बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुलायमसिंगांना पटविण्यासाठी लालूंची धावपळ title=

पाटणा : महाआघाडीतून मुलायम सिंग यादव बाहेर पडल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांची धावाधाव सुरू झालीय. 

भाजपला धोबीपछाड देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाआघाडीतून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव बाहेर पडल्यामुळं बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथींना वेग आलाय. मुलायमसिंहांची समजूत काढण्यासाठी लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांची धावाधाव सुरू झालीय. मुलायम यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. 

मात्र, मुलायम यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुलायम यांनी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळं जेडीयू आणि आरजेडीचं धाबं दणाणले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.