जोधपूर : उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पण तणाव असतांना देखील पाकिस्तानातील एक तरुणी भारतातील तरुणासोबत विवाह करण्यासाठी भारतात पोहोचली आहे. कराची येथील राहणारी प्रियाचा जोधपूरमधील नरेश याच्यासोबत विवाह होणार आहे.
जोधपूरला पोहोचल्यानंतर तिने म्हटलं की, विजा मिळतांना खूप अडचणी आल्या. घरात सगळेच जण चिंतेत होते. पण मी खूप आशावादी आहे. मला सुरुवातीपासूनच विश्वास होता की, काही तरी रस्ता निघेल. प्रियाने म्हटलं की दोन्ही देशातील लोकांचं जगणं आणि राहणीमान सारखंच आहे. भाषा पण समान आहे. अशात मला अॅडजस्ट करतांना काहीही अडचण येणार नाही.
दोन्ही देशांमध्ये जर उद्या काहीही अडचणी आल्यात तर त्यासाठी मानसिक रित्या मी तयार आहे.
जोधपूरमध्ये प्रिया आणि तिच्या कुटुंबाचं जोरदार स्वागत झालं. स्वागत करतांना तिने त्यादरम्यान डान्स करत आनंद व्यक्त केला. सोमवारी यांचा विवाह होणार आहे. सिंधी रितीरिवाजाप्रमाणे त्यांचा विवाह होणार आहे. उरी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांना वीजा देतांना थोडी कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे यांचा विवाह लांबला गेला.