नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमधील सत्तासंघर्षाचा मुद्दा लोकसभेत गाजला. गोवा आणि मणिपूरवरून लोकसभेत गदारोळ झाला. लोकसभेत काँग्रेसने बहिष्कार घालत सभात्याग केला. यावेळी ही तर लोकशाहीची हत्या, असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.
भाजपवर घोडेबाजाराचा आरोप करत काँग्रेस खासदारांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेत काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष असला तरी दुसऱ्या स्थानी असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला.
छोट्या पक्षांचा आधार घेत भाजपने सत्ता स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्यात. तर अंतर्गत मतभेद आणि संथगतीच्या कारभारामुळे काँग्रेसला बहुमत असूनही सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही, असे दिसून येत आहे. छोट्या पक्षांचा पाठिंबा घेताना भाजपने त्यांना मंत्रिपदाचे आश्वासनचे गाजर दाखविले. त्यामुळे भाजपला ते शक्य झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.