www.24taas.com , झी मीडिया, पाटणा
पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या झालेल्या सभेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. स्फोटासाठी अनेक दिवसांपासून प्लानिंग सुरू असल्याचं मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होतंय.
बॉम्बस्फोटाप्रकरणी पकडल्या गेलेल्या संशयितांच्या घरी कॅलेंडरवर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या अनेक तारखांवर सही असल्याचं निशाण आणि कोडवर्डमध्ये लिहिलेलं दिसून आलं. झी मीडियानं संशयित इम्तियाज अंसारीला पकडण्यात आल्यानंतर त्याच्या घराची पाहणी केली. त्यात हे दिसून आलंय...
ऑक्टोबर महिन्याच्या कॅलेंडरवर मागच्या भागावर हिंदीमध्ये ९ एमएम, कार्बाइन, पेलेंट गन, एसाल, इंसास गलाब पीस असे शब्द लिहिण्यात आलेत... ही नावं म्हणजे हत्यारं आणि स्फोटकांची नावं आहेत... ज्यांचा उपयोग दहशतवादी हल्ल्यामध्ये केला जातो... त्याचप्रमाणं ऑक्टोबर महिन्याच्या २१ ते २५ तारखेपर्यंत सहीचं निशाण आहे.
पाटण्यामध्ये २७ ऑक्टोबरला बॉम्बस्फोट झाले होते. मात्र असं सांगितलं जातंय की इम्तियाज २५ ऑक्टोबरलाच कोलकात्याला जायचंय असं सांगून घरून निघाला होता. इंडियन मुजाहिद्दीनच्या रांची मॉडेलनंच पाटण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवल्याचा दावा झारखंड पोलीस करतायत आणि त्याचेच पुरावे हे मिळालेलं साहित्य देतायत...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.