पेटीएमकडून दोन टक्के शुल्क वाढीचा निर्णय मागे

ऑनलाईन पेमेंटसाठी पेटीएमची सुविधा वापरणा-या क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Mar 10, 2017, 04:46 PM IST
पेटीएमकडून दोन टक्के शुल्क वाढीचा निर्णय मागे

मुंबई : ऑनलाईन पेमेंटसाठी पेटीएमची सुविधा वापरणा-या क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. क्रेडिट कार्डधारकांसाठी पेटीएमनं दोन टक्के शुल्क लावण्याचा निर्णय अखेर मागे घेतलाय. ग्राहकांच्या सोयीसाई हा निर्णय घेण्यात आल्याचं पेटीएमकडून सांगण्यात आलंय.

क्रेडिट कार्डधारक आपल्या खात्यात झिरो बॅलन्स असतानाही क्रेडिट कार्डचा वापर करून पेटीएमच्या माध्यमातून आर्थिक सुविधांचा लाभ घेतात, त्यामुळे दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अन्य मार्गानं असा गैरवापर टाळण्यासाठी पावलं उचलली जाणार असल्याचंही पेटीएमतर्फे सांगण्यात आलाय.