इच्छाधारी नागाला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी

औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर गावातील उमगा प्राचीन मंदिरात आज सकाळपासून दिसत असलेल्या एका  नागाला पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली आहे.

Updated: Dec 5, 2015, 01:17 PM IST

बिहार : औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर गावातील उमगा प्राचीन मंदिरात आज सकाळपासून दिसत असलेल्या एका  नागाला पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली आहे.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की हा इच्छाधारी नाग असून यांचे दर्शन घेतले असता सर्व इच्छा पूर्ण होतात. आज सकाळी ९ वाजल्यापासून ४० हजारांहून अधिक लोकांना या नागाचं आतापर्यंत दर्शन घेतलं आहे.

प्रशासनाने या घटनेची दखल घेत येथे पोलिसांची संख्या वाढवली असून सीआरपीएफची एक तुकडी या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. या इच्छाधारी नागाला पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. 

पाहा इच्छाधारी नागाचा व्हिडिओ.....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.