पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. 

Updated: Jun 30, 2014, 07:46 PM IST
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. 

पेट्रोलचे दर प्रतिलिटर जवळपास दोन रुपये म्हणजेच 1 रूपया 69 पैशांनी वाढवण्यात आला आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 50 पैशांची वाढ झाली आहे. 

हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
 
आधी रेल्वेभाडेवाढीनंतर पेट्रोलसोबत डिझेलच्या दरात वाढ केली आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणार्‍या मोदी सरकारने पुन्हा एकदा सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकलले आहे.
 
पेट्रोलसह डिझेलच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे बोलले जात आहे. 

सोबतच इराकमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धानेही पेट्रोलच्या दरवाढीला खतपाणी दिले आहे. परिणामी सामान्य जनतेच्या पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागणार आहे.  

दरम्यान, काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारारला सत्तेत येऊन 34 दिवस झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.