पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ

पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आलंय. पण, या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही. 

Updated: Jan 1, 2015, 08:08 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवण्यात आलंय. पण, या वाढलेल्या उत्पादन शुल्काचा बोझा जनतेवर पडणार नाही. 
 
आज मध्यरात्रीपासून इंधनांच्या उत्पादन शुल्कात दरवाढ लागू होणार आहे. उत्पादन शुल्क वाढवल्यानं ही वाढ होणार असल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, यामुळे सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीही फरक पडणार नाही.

या उत्पादन शुल्क दर दरवाढीचा उपयोग पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत घटल्यानं पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी घट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. 

सध्या मुंबईत प्रती लिटर पेट्रोलची किंमत 68.65 रुपये, दिल्लीत 61.33 रुपये, कोलकातामध्ये 68.65 रुपये तर चेन्नईमध्ये 63.94 रुपये आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.