पेट्रोल आणि डिझेल दरात आज रात्रीपासून कपात

पेट्रोल आण डिझेलच्या किंमती पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल २.४२  रुपये, तर डिझेल२.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

PTI | Updated: Feb 3, 2015, 06:15 PM IST
पेट्रोल आणि डिझेल दरात आज रात्रीपासून कपात title=

नवी दिल्ली : पेट्रोल आण डिझेलच्या किंमती पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल २.४२  रुपये, तर डिझेल२.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, त्याचवेळी रिक्षा, बस यांच्या दरात कपात न केल्याने यांचा भुर्दंड सामान्यांना बसत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत पुन्हा एका पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात केली आहे. २० दिवसांत ही दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. 

मागणी कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरल्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ४५ डॉलरने घटल्याने ही कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.