पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.

Updated: Aug 1, 2015, 09:06 AM IST
पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त title=

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.

पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ४३ पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर ३ रुपये ६० पैशांनी स्वस्त झालेय. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

तसेच विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात २३.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवीन दरानुसार १४ किलो वजनाचे विना अनुदानित सिलेंडर ५८५ रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत आता पेट्रोलची किंमत ६९.५१ रुपये प्रति लिटर असेल तर राजधानी दिल्लीत पेट्रोल ६६.९ रुपये प्रति लिटर उपलब्ध होईल. 

डिझेलसाठी मुंबईकरांना ५१.२९ रुपये प्रति लिटर तर दिल्लीकरांना ४६.१२ रुपये प्रति लिटर मोजावे लागतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.