www.24taas.com, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे. यंदा पी. चिदम्बरम यांनी मांडलेला अर्थसंकल्प अप्रतिम असून त्यात समाजातील सगळ्या वर्गांचा विचार केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली.
भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या गंभीर आव्हानांचा विचार करता अर्थमंत्र्यांनी अत्यंत कौतुकास्पद काम केलं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत मोठा मार्गदर्शक नकाशा अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. नुकसानावर जर नियंत्रण ठेवणं शक्य झालं, तर महागाईदेखील अवाक्यात येईल. या बजेटमध्ये गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगला रोडमॅप सादर झाला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं.
अर्थव्यवस्थेचा निराशाजनक मूड बदलण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे सध्या अनेक प्रश्न उभे आहेत. त्यांचा निर्णय घेण्यासाठी बहूआयामी रणनीती आवश्यक आहे. यासाठी हे बजेट उपयोगी पडेल, असं पंतप्रधान मुखमंत्री म्हणाले आहेत.