उद्धव ठाकरेंनी मागणी केली, मोदींनी मान्य केली!

शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे दिल्लीतल्या पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत.

Updated: Feb 28, 2017, 06:53 PM IST
उद्धव ठाकरेंनी मागणी केली, मोदींनी मान्य केली! title=

नवी दिल्ली : शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे दिल्लीतल्या पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत. आमचे हे गडकिल्ले मोकळे करून द्या. आम्ही त्यांची निगा राखतो, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींकडे केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी मोदी सरकारनं मान्य केली आहे.

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय.

या बैठकीत रायगडच्या विकासाच्या डीपीआरचे अधिकार राज्याकडे सोपवण्यात आले आहेत. यापूर्वी गड-किल्ल्यांच्या विकास आणि संवर्धनाबाबत परवानगी घेण्यासाठी दिल्लीचे हेलपाटे घालावे लागत होते. आता या निर्णयामुळं किल्ल्यांच्या विकासाचं काम त्वरीत हातात घेता येणार असून गड-किल्ल्यांची पडझड रोखता येणार आहे.

मुंबईमध्ये शिवस्मारकाच्या भूमिपुजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली होती. यानंतर फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यानंतर ही मागणी आता मान्य झाली आहे.