पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार एकाच व्यासपिठावर

गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशपर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 5, 2017, 04:40 PM IST
पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार एकाच व्यासपिठावर title=

पाटणा : राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका व्यासपीठावर आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमाराचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

बिहारमध्ये नितीश कुमारांनी घेतलेल्या दारुबंदीच्या निर्णयाचे मोदींनी यावेळी कौतुक केलं आहे. तसंच हा निर्णय इतर राज्यांसाठी प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशपर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते.