पंतप्रधान मोदी आणि २२ इतर नेते होते यांच्या निशान्यावर

एनआयएने मदुरै येथून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ज्यांचा संबंध मैसूर ब्लास्ट प्रकरणाशी असल्याचा सांगितला जातंय. हे दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २२ नेते या दहशतवाद्यांच्या निशान्यावर होते. श्मशुद्दीन आणि मोहम्मद आयूब असं हे या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत.

Updated: Nov 29, 2016, 04:54 PM IST
पंतप्रधान मोदी आणि २२ इतर नेते होते यांच्या निशान्यावर title=

नवी दिल्ली : एनआयएने मदुरै येथून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ज्यांचा संबंध मैसूर ब्लास्ट प्रकरणाशी असल्याचा सांगितला जातंय. हे दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २२ नेते या दहशतवाद्यांच्या निशान्यावर होते. श्मशुद्दीन आणि मोहम्मद आयूब असं हे या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत.

याआधी एनआयने तीन अन्य संशयितांना अटक केली होती. अल-कायदा सोबत यांचा संबंध असल्याचा संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांच्या निशान्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील मोठे २२ नेते होते. त्यांच्याकडून विस्फोटकं आणि हत्यारं पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

एनआयएची यावर १० दिवसांपासून नजर होती. पोलिसांनी म्हटलं की, संशयितांवर मैसूर, चित्तूर, कोल्लम, नेल्लोर आणि मल्लापुरम येथे ब्लास्ट केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या देशांच्या अँम्बेसींना धमकी दिल्याचा देखील यांच्यावर आरोप आहे. पुढील तपासासाठी त्यांना मैसूरला नेण्यात आलं आहे.

एनआयएला मदुरैच्या जवळ अल कायदा मॉड्यूल अॅक्टिव्ह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारले. त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.