राज्यसभेत ओबीसी विधेयक का अडवलं जातंय? - मोदी

राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 13, 2017, 08:48 AM IST
राज्यसभेत ओबीसी विधेयक का अडवलं जातंय? - मोदी title=

नवी दिल्ली :  राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यासाठीचं हे विधेयक विरोधकांनी राज्यसभेत अडवून धरलंय. ओबीसी समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असल्यानं विरोधक ते का अडवून धरतायत, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला. 

लोकसभेत याबाबतचं विधेयक संमत झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या हितासाठी हे विधेयक किती महत्त्वाचं आहे, याची माहिती ओबीसी समाजबांधवांना द्या, असं आवाहनही मोदींनी ओबीसी खासदारांना केलं.