नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवर सबसिडी देण्याबद्दल विचार करतील असं आश्वासन आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिलं. तर राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के अशा शा गुणोत्तर पडून असेलेला कांदा बाजार भावानं खरेदी करेल असा निर्णयही दिल्लीत घेण्यात आलाय.
राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी आज दिल्लीत एक महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीला स्वतः गडकरींशिवाय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार कृषीमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंवर्धन गिरीष महाजन, पणनमंत्री सदाभाऊ खोत, कृषी मंत्री पांडुरंग फुडकरही उपस्थित होते. . बैठकीत कांदा उत्पादक शेतकरीही होते. यावेळी व्यापाऱ्यांना ट्रॉलीतून आणलेला कांदा खरेदी करावाच लागेल असंही पांडूरंग फुंडकर यांनी स्पष्ट केलं.