लखनऊ : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील शेवटच्या टपप्यासाठी सर्वपक्षिय नेत्यांनी चांगलाच जोर लावलाय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील रोडशोला सुरुवात झालीये.
वाराणसीतून लोकसभेवर निवडून गेलेल्या मोदींनीं प्रचारात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. शनिवारी सकाळी वाराणसीत येताच त्यांनी प्रथम पं. मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली.
त्यानंतर ओपन जीपमधून रोडशोला सुरुवात केली. मोदींना पहाण्यासाठी रस्त्यावर जनसागर उसळलाय. हर हर मोदी.. घर घर मोदी... च्या घोषणांनी रोडशोला सुरुवात झालीये.
थोड्याच वेळात मोदी काळभैरव मंदिर आणि काशी विश्वनाथ येथे जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर काशी विश्वनाथ येथे त्यांची पहिली सभा होईल.