खुर्चीत बसायला नाही, सेवा करायला आलोय - नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतील कडकडडुमा इथं दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराराचं रणशिंग फुंकलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक करताना, ज्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्याच हाती सत्ता द्या, असं आवाहन दिल्लीकरांना केलं. 

Updated: Feb 1, 2015, 03:09 PM IST
खुर्चीत बसायला नाही, सेवा करायला आलोय - नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतील कडकडडुमा इथं दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराराचं रणशिंग फुंकलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक करताना, ज्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्याच हाती सत्ता द्या, असं आवाहन दिल्लीकरांना केलं. 

दिल्लीमुळे देशाची जगात ओळख आहे, इथल्या घटनांचा पूर्ण जगावर परिणाम होतो. तुम्ही बोलावलंत म्हणून मी इथं आलो आहे, पण मी खुर्चीत बसण्यासाठी नव्हे तर लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या आठवड्याभरावर आली असून त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

दिल्लीनं १५ वर्ष अराजक पाहिले आहे, मला दिल्लीला अराजकतेतून बाहेर काढायचं आहे, मला जनतेची सेवा करायची आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावरही हल्ला चढवला. गेल्या वेळी तुम्ही ज्यांना गादीवर बसवलं, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. जनता एकदा चूक करते, पण पुन्हा-पुन्हा तीच चूक करत नाही. दिल्लीला स्थिर सरकार आणि अनुभवी मुख्यमंत्री हव्या आहेत. कृष्णानगर नवा मुख्यमंत्री देईल, असं सांगत त्यांनी भाजपाला भरघोस मतं देण्याचं आवाहन केलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.