'आकाशवाणी'वर पंतप्रधानांची 'मन की बात'!

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच रेडिओद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते अनेक विषयांना हात घालण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर आज सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. 

Updated: Oct 3, 2014, 11:05 AM IST
'आकाशवाणी'वर पंतप्रधानांची 'मन की बात'! title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच रेडिओद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते अनेक विषयांना हात घालण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर आज सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. 

ऑल इंडिया रोडिओवर पंतप्रधानांच्या भाषणाचा जवळपास ५० मिनिटांचा हा कार्यक्रम प्रसारित होईल. याच भाषणाचा २४ भारतीय भाषांमध्ये अनुवाददेखील होईल. दूरदर्शनवरही पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येणार आहे यासाठी पंतप्रधानांच्या भाषणाशी निगडीत छायाचित्रणाचाही वापर करण्यात येणार आहे.

सरकारी ‘माय जीओव्ही’ नावाच्या एका वेबसाईटवर नागरिकांकडून पंतप्रधानांनी आपले विचार मागवले होते. त्यानंतर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रेडिओ हे माध्यम मोदींनी निवडलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.