पंतप्रधानांची संपत्ती दुप्पट, मंत्र्यांची कोटींची उड्डाणे

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची संपत्ती १० कोटी ७३ लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे त्यांची संपत्ती गेल्या वर्षाभरात दुप्पट झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 10, 2012, 09:29 AM IST

www.24taas.comनवी दिल्ली
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची संपत्ती १० कोटी ७३ लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे त्यांची संपत्ती गेल्या वर्षाभरात दुप्पट झाली आहे. असे असताना मंत्रीही कोट्यधीश झाले आहेत. यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांच्या नावांचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या संपत्तीचे आकडे पाहिले तर मात्र पंतप्रधान खूपच मागे असल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वांत श्रीमंतमंत्री आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५४ कोटी रुपये आहे.
शरद पवार यांच्याकडे २२ कोटी रूपयांची संपत्ती आहे. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी सर्वांत गरीब केंद्रीय मंत्री आहेत. अँटनी यांच्याकडे केवळ ५५ लाख रुपयांची संपत्ती आहे.
पंतप्रधानांची संपत्ती गेल्या वर्षी ५.११कोटी होती. चंडीगड आणि दिल्लीतील त्यांच्या फ्लॅटची किंमत गेल्या वर्षी १.७८कोटी होती, तर त्यांच्याकडे १५०ग्रॅम सोने होते. पंतप्रधानांची संपत्ती तेवढीच राहिली असून केवळ स्थावर मालमत्तेच्या किमतीत वाढ झाल्याचे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सरकारमान्य मूल्यांककाकडून या मालमत्तेचे मूल्यांकन झाले आहे.
पंतप्रधानांकडे चंडीगड आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक फ्लॅट आहे. या दोन्ही फ्लॅटची सध्याची एकत्रित किंमत ७ कोटी २७ लाख आहे. तर आसाममधील दिसपूरमध्ये बॅंक खात्यात ६,५०० रुपये आहेत. मारुती ८००- प्रिसिएशननंतर २१ हजार बॅंकांमधील ठेवी ३लाख ७६ हजार रूपये तर १५० ग्रॅम सोने आहे. अशी एकूण संपत्ती १०कोटी ७३ लाख आहे.
कोटीची उड्डाणे घेणारे मंत्री
प्रफुल्ल पटेल - ५४ कोटी
कपिल सिब्बल - ४५.३३कोटी
(पत्नीच्या नावे ८.११ कोटी)
शरद पवार - २२कोटी
पी. चिदंबरम -११.९६6 कोटी
सुशीलकुमार शिंदे - ५.१३ कोटी
(पत्नीच्या नावे ३.२०कोटी)
एस. एम. कृष्णा - १.८९कोटी
(सोनाटा आणि लॅन्सर कार)
वायलर रवी - १.१०कोटी
(फोर्ड कार आणि ९०० ग्रॅम सोने)
अजित सिंग - २२ कोटी
(उत्तर प्रदेशात जमिनींमध्ये गुंतवणूक)
जयराम रमेश - ५६ लाख
(पत्नीची बॅंकेतील गुंतवणूक १४लाख)
आईची गुंतवणूक - ४.१६कोटी
आईच्या नावे असलेले शेअर्स
बॅंकेतील ठेवींचे जयराम रमेश वारसदार
फारुक अब्दुल्ला - २.२५कोटी
(श्रीनगरमधील जमीन नुकतीच २६ लाखांना विकली)