www.24taas.com, गुवाहाटी
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी राज्यातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येसाठी बांग्लादेशी निर्वासितांना दोषी न धरता भारतातीलच मुस्लिमांना दोषी मानलं आहे. मागासलेपण, अपूर्ण शिक्षण यामुळे भारतीय मुस्लिम कुटुंब नियोजनासारख्या प्रगत गोष्टींचा विचार नकरता अधिकाधिक मुलं जन्माला घालतात. यामुळेच देशातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
एका टीव्ही कार्यक्रमात मुलाखत देत असताना गोगोई म्हणाले, की आडाणी मुस्लिम समाजामुळे देशाची लोकसंख्या वाढत आहे. प्रत्येक मुस्लिम कुटुंबात सरासरी ६,७,८,९, १० मुलं जन्माला येत असतात. अशिक्षित लोकच एवढ्या मुलांना जन्म देतात. माझा १००% विश्वास आहे, की आडाणीपणामुळे भारतातील मुस्लिमांची संख्या वाढली आहे.
२००१ मध्ये आसाममधील मुस्लिमांची लोकसंख्या देशातील सरासरीपेक्षा कमी होती. २०११ मध्ये आता मुस्लिमांची संख्या देशातील संख्येपेक्षा सरासरीने वाढली आहे. यातूनच सिद्ध होतंय की बांग्ला देशातून येणाऱ्या मुस्लिमांपेक्षा अज्ञानी मुस्लिमांमुळे देशाची लोकसंख्या वाढत आहे.
मुस्लिमांवरच अधिक कारवाई होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला जाताच ते म्हणाले, की हे सर्व खोटं आहे. आम्ही बांग्लादेशी घुसखोरांनाही पकडत आहोत आणि बोडो अतिरेक्यांनाही. मला कुणाच्याही समर्थनाची गरज नाही.