तब्बल २० वर्षांनी संपुष्टात आला 'गांधी मला भेटला' कवितेचा वाद!

वसंत गुर्जर लिखित 'गांधी मला भेटला' या कवितेचा अखेर सुप्रीय कोर्टात निकाल लागलाय... आणि प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांच्या माफीनाम्यानं अखेर या २१ वर्ष जुन्या वादावर पडदा पडलाय. 

Updated: May 14, 2015, 01:04 PM IST
तब्बल २० वर्षांनी संपुष्टात आला 'गांधी मला भेटला' कवितेचा वाद! title=
'गांधी मला भेटला' ही १९८३मधे पहिल्यांदा प्रसिद्ध झालेली पोस्टर कविता... पोस्टर दुमडल्यानंतर जी घडी हातात बसते तिचा वरील फोटो... त्याच्यावर बाळ ठाकूरांनी काढलेलं पाठमोऱ्या गांधीजींचं चित्रही आहे.

नवी दिल्ली : वसंत गुर्जर लिखित 'गांधी मला भेटला' या कवितेचा अखेर सुप्रीय कोर्टात निकाल लागलाय... आणि प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांच्या माफीनाम्यानं अखेर या २१ वर्ष जुन्या वादावर पडदा पडलाय. 

नेमकं काय आहे प्रकरण... 
१९९४ मध्ये बॅँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचा-यांसाठी प्रकाशित होणा-या एका मासिकात कवी वसंत गुर्जर यांची 'मला गांधी भेटला' ही कविता प्रकाशित करण्यात आली होती. या कवितेत कवीला महात्मा गांधीजी भेटतात अशी संकल्पना आहे.

या कवितेत महात्मा गांधींचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत काही संघटनांनी कोर्टात धाव घेतली होती... मासिकाचे संपादक आणि बँक कर्मचारी देवीदास तुळजापूरकर यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. 

यावर, लेखकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहेच... पण, आपली या कवितेतल्या ओळी असभ्यतेकडे वळतात. स्वातंत्र्याच्या नावाखाली चौकटीबाहेर जाऊन एखाद्या राष्ट्रपुरुषाचा अनादर करणं योग्य नाही. आणि या कवितेमध्ये आक्षेपार्ह, अश्लील अशा शब्दांचा वापर करण्यात आलाय, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिला होता. 

यावेळी, असभ्यतेच्या आरोपातून मुक्त करण्यास नकार देत खालच्या न्यायालयानं तुळजापूरकर यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. पण, समाजात तेढ पसरवण्याच्या आरोपातून प्रकाशक आणि कवीला मुक्त करण्यात आलं होतं.

या निर्णयाला तुळजापूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर, सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानंही तुळजापूरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल मान्य करण्याचे आदेश दिले. 

त्यानंतर तुळजापूरकरांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आणि हा वाद तब्बल २० वर्षांहून अधिक काळानंतर संपुष्टात आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.