सिनेमा हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडले जोडपे, २३ जणांना अटक

 कोलकता पोलिसांनी एका सिनेमा हॉलमधून विचित्र अवस्थेतील २३ जणांना अटक केली आहे. अटक झालेल्या व्यक्ती सेक्स करताना असतानाचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Updated: Aug 27, 2015, 04:07 PM IST
सिनेमा हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडले जोडपे, २३ जणांना अटक  title=

कोलकता :  कोलकता पोलिसांनी एका सिनेमा हॉलमधून विचित्र अवस्थेतील २३ जणांना अटक केली आहे. अटक झालेल्या व्यक्ती सेक्स करताना असतानाचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

अटक झालेल्यामध्ये १३ पुरूष आणि १० महिला आहेत. हावडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की बुधवारी संकर आणि कालिया सिनेमा हॉलमध्ये छापा मारण्यात आला. हे दोन्ही उत्तर २४ परगणा येथे आहेत. संकर सिनेमा हॉलमध्ये 'ऑल इज वेल'चा शो सुरू होता. त्या ठिकाणी पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये पोहचली आणि कारवाई केली. 

अधिक वाचा : फेसबूकवर प्रियकराने अपलोड केले प्रेयसीचे अश्लिल फोटो

सर्वांना अटक करून पोलिस स्टेशनला नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सूचित करण्यात आले. एएसपी भास्कर मुखर्जी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये सिनेमा हॉलमध्ये असे प्रकार वाढीस लागले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.