भ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी

रस्त्यावर लोकांची मारामारी तर आपण नेहमीच बघतो, पण उत्तर प्रदेशमध्ये चक्क पोलिसांनीच मारामारी केली आहे. अवैधरित्या केलेल्या वसुलीचे पैसे वाटण्यावरून या पोलिसांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. हाणामारीची ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. 

Updated: Jun 27, 2016, 04:21 PM IST
भ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी

लखनऊ : रस्त्यावर लोकांची मारामारी तर आपण नेहमीच बघतो, पण उत्तर प्रदेशमध्ये चक्क पोलिसांनीच मारामारी केली आहे. अवैधरित्या केलेल्या वसुलीचे पैसे वाटण्यावरून या पोलिसांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. हाणामारीची ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. 

या व्हिडिओमध्ये चार पोलीस दिसत आहेत. पैशांचं योग्य वाटप न झाल्यामुळे दोन पोलीस भांडत आहेत, यानंतर या दोघांमध्ये हाणामारीला सुरुवात होते. या दोघांना रोखण्याचा उरलेले दोन पोलीस प्रयत्न करतात. पोलिसांची ही मारामारी बघण्यासाठी बाजूला मोठ्या प्रमाणावर लोकही जमा झाले होते. 

सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या पोलिसांपैकी एकजण शिपाई वीरेंद्र यादव आहे तर दुसरा होमगार्ड अनुज आहे.  

पाहा हाणामारीचा हा व्हिडिओ

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x