पूनम महाजन 'भाजयुमो'च्या अध्यक्षपदी

भाजप खासदार पूनम महाजन यांची भाजयुमोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.

Updated: Dec 16, 2016, 01:31 PM IST
पूनम महाजन 'भाजयुमो'च्या अध्यक्षपदी  title=

मुंबई : भाजप खासदार पूनम महाजन यांची भाजयुमोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.

दुसऱ्यांदा भाजपाध्यक्ष झाल्यानंतर अमित शहांनी पहिल्यांदाच काही फेरबदल केलेत. पूनम यांनी अनुराग ठाकूर यांचं स्थान आता काबीज केलंय. अनुराग ठाकूर गेली सहा वर्ष भाजयुमोचे अध्यक्ष होते. ३६ वर्षीय पूनम महाजन दिवंगत नेता प्रमोद महाजन यांची कन्या... सध्या त्या मुंबई उत्तर मध्यविभागाच्या खासदार आहेत. 

पूनम महाजन यांचं भाजयुमोच्या अध्यक्षपदी नावं घोषित करतानाच एससी, ओबीसी आणि किसान मोर्चाच्या नव्या प्रमुखांची नावंही घोषीत केली. रामविचार नेताम, विरेंद्र सिंह, आणि माजी खासदार दारा सिंह चौहान हे अनुक्रमे एससी, एसटी आणि किसान मोर्चा आणि ओबीसी शाखांचे नवे अध्यक्ष आहेत.