मोदी सरकारमध्ये होणार मोठे फेरबदल ?

केंद्रीय मंत्रिमंडळात तसंच भाजप पक्ष संघटनेतही लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत

Updated: May 20, 2016, 11:22 PM IST
मोदी सरकारमध्ये होणार मोठे फेरबदल ? title=

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात तसंच भाजप पक्ष संघटनेतही लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. 11 आणि 12 जूनला भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. त्यापूर्वी सरकार आणि पक्ष संघटनेत बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या 7 आरसीआर निवासस्थानी शुक्रवारी संध्याकाळी मोदी, अमित शाह आणि अरूण जेटली यांची बैठक झाली. काही मंत्र्यांना पक्ष संघटनेत पाठवलं जाणार आहे, तर उत्तर प्रदेशातून काही जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व दिलं जाणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. मोदींच्या अमेरिका दौ-यापूर्वी हे बदल होण्याची शक्यता आहे.