दोन केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा

 केंद्रीय मंत्रीमंडळातून ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या मंत्र्यांना सुट्टी देण्यात आली आहे.  केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेप्तुल्ला आणि जी. एम. सिद्धेश्वर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. 

Updated: Jul 12, 2016, 08:42 PM IST
दोन केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा  title=

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रीमंडळातून ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या मंत्र्यांना सुट्टी देण्यात आली आहे.  केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेप्तुल्ला आणि जी. एम. सिद्धेश्वर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. 

दरम्यान, राष्ट्रपती यांनी दोघांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे. 

नजमा हेप्तुल्ला यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालयाचा प्रभार होता. त्याच्यासोबतजी एम सिद्धेश्वरा यांचाही कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा  दिला आहे. 

मुख्तार अब्बास नकवी यांची बढती झाली असून त्यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीचा स्वतंत्र प्रभार  देण्यात आला आहे. 

बाबुल सुप्रियो यांना शहर विकास राज्यमंत्रालयातून अवजड उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदी बदली करण्यात आली आहे.