चेन्नई : तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांची 73 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली.
आज चार वाजता चेन्नईच्या मरीना बीचवर अंत्यसंस्कार होणार आहेत. तामिळनाडूत जनतेचा शोक अनावर झालाय. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अम्मा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चेन्नईला पोहोचणार आहेत. पंतप्रधान मोदी दिल्लीहून चेन्नईसाठी रवाना झाले आहेत तर राष्ट्रपती देखील चेन्नईला पोहोचणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधीदेखील अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
तमिळनाडूत सात दिवस राजकीय शोक पाळण्यात येणार आहे. तर शाळा, कॉलेज तीन दिवस बंद राहणार आहेत.
Delhi: PM Narendra Modi emplanes for Chennai, will pay floral tributes to #JJayalalithaa who passed away, yesterday pic.twitter.com/9KCPdUz3JD
— ANI (@ANI_news) December 6, 2016
President Pranab Mukherjee will travel to Chennai today to pay last respects to former Tamil Nadu Chief Minister #JJayalalitha.
— ANI (@ANI_news) December 6, 2016