नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयपेयींचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आज गौरव होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं वाजपेयींच्या निवासस्थानी भारतरत्न पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात येणार आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव वाजपेयींचा त्यांच्या निवासस्थानीच गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून वाजपेयींच्या निवासस्थानी त्यांना गौरवण्यासाठी जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित असतील.
वाजपेयींच्या राजकीय कारकिर्दीसह त्यांचे सामाजिक योगदान, भारत-पाकिस्तान मैत्री दृढ करण्यासाठी केलेल प्रयत्न आणि साहित्यातील भरीव योगदानाबद्दल वाजपेयींना भारतरत्न जाहीर झाला. पं. मदनमोहन मालवीय यांना ३१ मार्च रोजी मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.