अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रवाना होणार

ज्या अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हीसा नाकारला, तेच आता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना होणार आहेत. 100 तासांच्या या दौ-यात मोदी 30 ते 35 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 

Updated: Sep 25, 2014, 12:44 PM IST
अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रवाना होणार title=

नवी दिल्ली : ज्या अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हीसा नाकारला, तेच आता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना होणार आहेत. 100 तासांच्या या दौ-यात मोदी 30 ते 35 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोदी भेट घेणार आहेत.. 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये ही भेट होणार आहे. पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. या बैठकीत आर्थिक प्रश्नांबरोबरच दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यावरही चर्चा होणार आहे. 

व्हाईट हाऊसमध्ये मोदी यांचं स्वागत करण्यासाठी बराक ओबामा उत्सुक असल्याचं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी स्पष्ट केलयं.  आर्थिक विकासाबरोबरच वाढता दहशतवाद, अफगाणिस्तान, सिरिया आणि इराक मधील परिस्थितीबद्दलची दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी 28 सप्टेंबरला न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये खास सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेत स्थायिक असलेल्या 20 हजार भारतीयांनी आतापर्यंत ऑनलाइन अर्ज केलेत. त्यामुळं लॉटरी काढण्याची पाळी इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशन संस्थेवर आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.