नवी दिल्ली : काही दिवसातच संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे काही आणखी वस्तूंची भाववाढही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर १ रुपया आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिट दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.