www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक २०१४ नंतर काँग्रेस पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत पंतप्रधान महमोहन सिंग यांनी दिलेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करताना आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी हेच योग्य उमेद्वार असतील, असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलंय.
रशियाच्या सेंट पाटर्सबर्गमध्ये जी-२० संमेलनात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान भारतात परतत होते. एअर इंडियाच्या विशेष विमानात आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या पत्रकारांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.
‘मी नेहमीच म्हमत आलोय की राहुल गांधी वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंदप्रधान पदासाठी सगळ्यात योग्य उमेदवार ठरतील. मला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करण्यात आनंदच होईल’ असं ८० वर्षीय पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय.
यावेळी अर्थव्यवस्थेवर बोलताना मनमोहन सिंग यांनी जापानबरोबर झालेल्या करन्सी करारानुसार देशाला अल्पकालीन मदत मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आर्थिक सुधारणांचा परिणाम लवकरच एफडीआयवर दिसून येईल असंही त्यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.