आई ओरडल्यामुळं बॅक बेंचर राहुल आज पहिल्या रांगेत!

आज अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क पहिल्या रांगेत बसलेले दिसले... जेटलींचं भाषण सुरू झालं, तेव्हा ते मागच्याच बाकांवर होते. 

PTI | Updated: Jul 10, 2014, 06:38 PM IST
आई ओरडल्यामुळं बॅक बेंचर राहुल आज पहिल्या रांगेत! title=

नवी दिल्ली: आज अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क पहिल्या रांगेत बसलेले दिसले... जेटलींचं भाषण सुरू झालं, तेव्हा ते मागच्याच बाकांवर होते. 

मात्र जेटलींची तब्येत खराब झाल्यानं त्यांनी ब्रेक घेतला तेव्हा राहुल आपल्या आईशी, अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी बोलण्यासाठी पुढे आले... त्यावेळी सोनियांनी पहिल्या रांगेत आपल्या बाजुला बसण्यास राहुलना सांगितलं. सुरूवातीला राहुल त्याला तयार नव्हते, पण अखेर ते विरोधी बाकांवर पहिल्या रांगेत बसलेच. त्यानंतर जेटली बजेट मांडत असताना ते नोट्स काढत होते आणि अधूनमधून सोनिया आणि मल्लिकार्जून खरगे यांच्याशीही बोलत होते.

काल महागाईवरील चर्चेवेळी राहुल गांधींचा डोळा लागल्याचं सगळ्या देशानं पाहिलंय. त्यामुळंच तर सोनियांनी त्यांना पहिल्या रांगेत बसवलं नसेल ना, अशी चर्चा दबक्या आवाजात संसद भवनात सुरू होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.