रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक?

यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 10, 2016, 10:32 PM IST
रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक? title=

नवी दिल्ली : यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे.

प्रवासी आणि माल वाहतुकीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ५ ते १० टक्क्यांनी ही वाढ अपेक्षित आहे.  

सातव्या वेतन आयोगामुळे रेल्वेवर ३२ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे आर्थिक घडी बसवण्यासाठी भाडेवाढ होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, मागील अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीपेक्षा रेल्वे मंत्रालयाने कमी खर्च केला आहे. यामुळेच अर्थ मंत्रालयानं २०१५-१६ च्या बजेटमध्ये त्यांना मिळणाऱ्या राशीत ८००० करोड रुपयांची कपात केलीय. 

यंदा, रेल्वे अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला तर अर्थसंकल्प २९ फेब्रुवारी रोजी होणार सादर होणार आहे.