नवी दिल्ली : दिवाळीच्या निमित्तानं रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. आता रेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधीही आरक्षण करता येणार आहे.
नेहमीच्या पद्धतीनं चार तास आधी गाड्याच्या आरक्षणाचे तक्ते तयार होतात. आता नव्या पद्धतीत दोन तक्ते तयार होतील. एक चार तास आधी आणि दुसरा अर्धा तास आधी..पहिला तक्ता चार तास आधी तयार होईल. त्यानंतर रिकाम्या असणाऱ्या जागांसाठी पुन्हा आरक्षणची खिडकी खुली करण्यात येईल.त्यामुळे गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत इंटरनेट आणि तिकीट खिडकीवर आरक्षण उपलब्ध असेल.
पण गाडी आधीच फुल्ल झालेली असेल तर मात्र या सुविधेचा फारसा फायदा होणार नाही. अर्धा तास आधी दुसरा तक्ता तयार होईल. हा नवा चार्ट गाडीतल्या टीसीला देण्यात येईल आणि मगच गाडी रवाना होईल. नव्या नियमांची अंमलबजाणी लवकरच करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.