प्रवाशांना सुटे पैसे देण्यास टाळाटाळ; रेल्वेला किती होतो फायदा...

रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षा चालकाकडे सुटे पैसे नसल्याने त्याने आपल्याला बाकीचे पैसे परत न केल्यास तुम्हाला राग येते असेल ना? पण तुम्हाला हे माहीत आहे की सुटै पैसे परत न केल्यानं रेल्वेला किती फायदा होतो...?

Updated: Nov 28, 2015, 05:17 PM IST
प्रवाशांना सुटे पैसे देण्यास टाळाटाळ; रेल्वेला किती होतो फायदा... title=

बंगळुरू : रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षा चालकाकडे सुटे पैसे नसल्याने त्याने आपल्याला बाकीचे पैसे परत न केल्यास तुम्हाला राग येते असेल ना? पण तुम्हाला हे माहीत आहे की सुटै पैसे परत न केल्यानं रेल्वेला किती फायदा होतो...?

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तिकीट काढल्यानंतर सुटे पैसे नसल्याच्या कारणावरून प्रवाशांना परत न दिलेल्या सुट्या पैशांतून रेल्वेला वर्षाला तब्बल १८०० कोटींची कमाई होते.  

रेल्वे तिकीटांचं भाडं राऊंड फिगरमध्ये घेणाऱ्या रेल्वेवर संजय कुमार या व्यक्तीनं आक्षेप घेतला आहे. रेल्वेचं भाडं जर २९७ रुपये असेल तर रेल्वे आपल्याकडून ३०० रुपये घेते, अशी त्यानं तक्रार नोंदवलीय.

संजय कुमार या व्यक्तीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे पण त्यांची याचिका अजून कोर्टाने स्वीकारलेली नाही. या प्रकरणावर रेल्वेकडूनही कोणतंही स्पष्टीकरण अजूनपर्यंत देण्यात आलेलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.