बंगळुरु : रेल्वेमंत्री सदानंद गौडांचा परिवार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक याच्याशी आपला विवाह झाला असून गौडा परिवारानं आपला सून म्हणून स्विकार करावा, अशी मागणी एका कन्नड अभिनेत्री आणि मॉडेलनं केल्यानं खळबळ माजली आहे.
या प्रकरणी बंगरुळुच्या आर.टी.नगर पोलीस स्टेशनमध्ये सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक विरोधात 376. 420 आणि 406 या कलमांअंतर्गत बलात्कार, विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. गौडा परिवारानं या मॉडेलचा दावा फेटाळला असून हे आपल्या परिवाराला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा रेल्वे मंत्री सदानंद गौडांनी केलाय.
कार्तिकचा साखरपुडा एका दुसऱ्या तरुणीसोबत होत असतानात या मॉडेल तरुणीनं हे आरोप केलेत. आरोप करणाऱ्या अभिनेत्री आणि मॉडेलची जबानी पोलीस नोंदवून घेत असून पुढील तपास सुरु आहे. मॉडेल आणि अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार तिचे आणि कार्तिक गौडाचे ८ मे २०१४ पासून संबंध असून त्याचं लग्नही झालं आहे. या प्रकाराची माहिती गौडा परिवाला होती, असा दावाही या मॉडेलनं केला आहे. या सर्व आरोपांचा सदानंत गौडांनी इन्कार केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.