रेल्वे अपघात टाळण्यासाठी येतंय डिटेक्टर डिवाइस!

रेल्वे रूळांवरून घसरण्यासारख्या घटना रोकण्यासाठी आता भारतीय रेल्वेनं डिटेक्टर डिवाइस लावण्याची योजना बनवली आहे. त्यामुळं जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानावर प्रतिबंध लागू शकेल.

Updated: Jul 21, 2014, 05:33 PM IST
रेल्वे अपघात टाळण्यासाठी येतंय डिटेक्टर डिवाइस! title=

नवी दिल्ली : रेल्वे रूळांवरून घसरण्यासारख्या घटना रोकण्यासाठी आता भारतीय रेल्वेनं डिटेक्टर डिवाइस लावण्याची योजना बनवली आहे. त्यामुळं जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानावर प्रतिबंध लागू शकेल.

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रेल्वे रुळावरून घसरण्याच्या स्थितीचे वेळेअगोदर संकेत देणारं डिवाइस परिक्षणासाठी तीन राजधानी आणि दोन शताब्दी एक्स्प्रेसमध्ये बसवलं जाईल आणि नंतर आणखी काही रेल्वेगाडयांमध्ये बसवण्यात येईल.

ज्या राजधानी आणि शताब्दी गाडयांमध्ये हे उपकरण बसवायचं आहे त्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. अधिकाऱ्यांनी सांगितलं की जर एखादा डब्बा रुळावरून घसरतो तर कंपनाचा स्तर वाढतो आणि कंपन वाढताच त्याचा आभास या उपकरणाला होतो. अशा स्थितीत हे उपकरण मोठी घटना होण्याआधीच ती थांबण्यासाठी उपयुक्त ठरेल. एखादा डब्बा रुळावरून घसरण्याची माहिती कळण्याच्या संदर्भात या डिटेक्टरच्या क्रियेची वेळ चालक अथवा गार्डच्या प्रतिक्रियाच्या वेळेपेक्षा खूपचं जास्त आहे.

एखादा डब्बा जर रूळावरून घसरला तर हा डिवाइस लगेचचं ब्रेक लावण्याचं काम करतं, ज्याने दूसरे डब्बे रुळावरून घसरत नाही. यामुळं जीवितहानी आणि मालमत्तेचं मोठं नुकसान टळू शकतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.